ॐ गं गणपत्येय नमः

                                 ॐ गं गणपत्येय नमः

                                                     गणपति बाप्पा मोरया 

                                                                   मंगलमूर्ती मोरया 


गणपती हिंदूंचे आराध्य दैवत आहे. किंबहुना, गणपती जगातील बऱ्याच देशांचे दैवत आहे. गणपती विद्येची देवता आहे. गणपती विघ्नहर्ता आहे. गणपती गणनायक आहे. गण म्हणजे देवता, उपदेवता, तारे, नक्षत्र, आकाशगंगा, सप्तऋषी इत्यादी. गणपतीच्या वर कुठलाही देव नाही. गणपती पुराण, गणेश गीता आणि गणपती उपनिषदात गणपतीची तुलना ब्रह्म सोबत केलेली आहे.

Ganapati Bappa Mahiti 2022 Marathi

गणपतीला हत्तीच तोंड लावलेले दिसते. हत्ती असा सस्तन प्राणी आहे कि जो आरशात स्वतला ओळखू शकतो. त्याच्या मेंदूतील न्युरोन्स मानवाच्या २.९१ पट असतात. मानावा खालोखाल बुद्धिवान प्राणी म्हणून हत्तीची गणना होते. गणपतीचे सुपासारखे कान मानवाला ध्यानपूर्वक लक्ष देण्यास सांगते. गणेशाची सोंड भय, अहंकार ई. विकार गिळून घ्यावे हि सूचना करते. गणेशाची सोंड सहसा डाव्या बाजूला असते. उजव्या सोंडेच्या गणपतीला "सिद्धिविनायक" म्हटले जाते. उजव्या सोंडेचा गणपती घरात ठेवू नये. कारण, त्याची पूजा-पद्धती खूपच बारकाईने करावी लागते. 

Ganapati Bappa Mahiti Marathi

गणपतीचे वेदातील स्थान :-

ॐ गणानां त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमम् ।

ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आ नः षृण्वन्नूतिभिः सीदसादनम् ॥ [ऋग्वेद  २.२३.१]

अर्थ : देवाधिदेव , सर्व गणांचा नेता (राजा), बुद्धिवानात बुद्धीवान, तिन्ही लोकांत प्रसिद्ध असलेला, ब्राह्मणातील राजाधिराज, हे ब्रह्मणस्पत (?) आपण आसनस्थ होऊन आमची पूजा स्वीकारावी

हा मंत्र गणपतीची प्राणप्रतिष्ठा करतांना देखील म्हटला जातो.

रुद्रो रुद्रश्च दन्तिश्च नन्दिः षण्मुख एव च ।

गरुडो ब्रह्मा विष्णुश्च नारसिहंस्तथैव च ।। [यजुर्वेद तैतरीय आरण्यक १०.१.१५]

अर्थ : यात देवांची नावे दिली आहे. रुद्र, दंती, नंदी, षण्मुख, गरुड, ब्रम्हा, विष्णू, नरसिम्ह. यात दंती हे नाव गणपतीचे आहे.

Ganapati Bappa Mahiti Marathi

तत्पुरुषाय विद्महे वक्रतुन्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् ।  [यजुर्वेद तैतरीय आरण्यक १०.१.५]

अर्थ : वक्र सोंड असलेल्या देवाची आम्ही प्रार्थना करतो. हे एकदंत आम्हला सत्मार्गवर जाण्यासाठी मार्गदर्शन कर.


नमो गणेभ्यो गणपतिभ्येश्च भो नमो: I [यजुर्वेद तैतरीय संहिता ४.५.४.१]

अर्थ : गणांचे नायक गणपतीस नमन.


यावरून दिसून येते कि गणपती वैदिक देवता आहे आणि वैदिक काळापासून गणपतीचे स्थान ब्रह्मसारखेच मानलेले आहे. 


गणपती उपनिषद (गणपत्यर्थवशीर्ष) :-

गणपती उपनिषद हा अथर्ववेदाचा भाग आहे. यात गणपतीची तुलना अद्वैत परब्रम्ह सोबत केली आहे. गणपती उपनिषदात म्हटल्याप्रमाणे गणपती हा देव ब्रह्म-विष्णू-शंकर आहे. गणपतीची तुलना हिंदू मंत्र ओम याबरोबर केली आहे. या उपनिषदात गणपतीला सत-चित-आनंद - सत म्हणजे सत्य, चित म्हणजे चित्त,चेतना - चित्ताला किंवा चेतनेला खरा आनंद देणारी देवता म्हणजे सच्चिदानंद!! गणपती उपनिषदात गणेश-गायत्री मंत्र पुढीलप्रमाणे,

एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात् II ८ II

अर्थ : ज्याची वक्र सोंड आहे अशा एकदंताची आम्ही योगसाधना करतो आणि हे एकदंत आम्हाला ज्ञान घेण्याची आणि योगसाधनेची प्रेरणा दे. 

Ganapati Bappa Mahiti Marathi

गणपती उपनिषदात साधारणतः १२ श्लोक आहेत. त्यापैकी पुढील श्लोकाद्वारे उपनिषदाची सुरुवात होते,


ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः । भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः । स्थिरैरङ्गैस्तुष्टुवागँसस्तनूभिः । व्यशेम देवहितं यदायूः । स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः । स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः । स्वस्ति नस्ताक्षर्यो अरिष्टनेमिः । स्वस्ति नो वृहस्पतिर्दधातु ॥ ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥


गणपतीअथर्वशीर्षाच्या वरील श्लोकात गणपतीला अरिष्टनेमी म्हणजेच संकटमोचन म्हटलेले आहे. वेदात आणि हिंदू साहित्यात इतर ठिकाणी अरिष्टनेमी म्हणजे नेमीनाथ अस काही लोक मानतात. नेमिनाथांना कृष्णाचे नातेवाईक देखील मानले जाते. पण, अरिष्टनेमी हे गणपतीला उद्देशून म्हटलेलं असल्यामुळे नेमीनाथ आणि कृष्णाचा काहीही संबध दिसून येत नाही. गणपतीची महिमा इतकी मोठी आहे की भगवान कृष्णांना देखील गणपतीची आराधना करावी लागली होती.


कुंडलिनीतील गणपती :- 

वैदिक हिंदू धर्मानुसार कुंडलिनी जागृत करणे हा मोक्ष मिळवण्याचा शोर्टकट मार्ग आहे. कुंडलिनी जागृत केलेला व्यक्ती अहंकार मुक्त असतो. त्याचे कर्म जवळपास शून्य झालेले असतात. त्यामुळे सदर व्यक्तीची आत्मा सरळ सातव्या प्रस्तरात जाते ज्याला मोक्ष म्हटले गेले आहे. 

गणपती बद्दल म्हटले गेले आहे,


 त्वं मूलाधारस्थितो॑‌सि नित्यम् |

 अर्थ : ज्याच निवास मूलाधारचक्रात आहे. 


गणपती मूलाधारचक्रात निवास करतो आणि तो ब्रह्मगाठीचा स्वामी आहे. जेव्हा गणेश हि ब्रम्हगाठ सोडवतो तेव्हा शक्ती/पार्वती/कुंडलिनी तिच्या पतीला म्हणजे शिवाला आलिंगन देण्यासाठी पुढे सरकते. शिवाच स्थान उच्चपातळीवर सहस्त्रचक्रात असते. जोपर्यंत गणेश बाधा दूर करत नाही तोपर्यंत शिव-शक्ती मिलन होत नाही. गणेशाच्या परवनागीनेच कुंडलिनी सुषुम्ना नाडीच्या सुरक्षित मार्गाने जाते. तो इडा आणि पिंगळा या नाडीचा मार्ग अवलंबत नाही. इडा आणि पिंगळा नाडी नाडी अनुक्रमे शरीराच्या डाव्या आणिं उजव्या बाजूस असतात तर सुषुम्ना नाडी शरीराच्या मध्यभागातून जाते. त्यामुळे सुषुम्ना नाडीचा मार्गामुळे शारीरिक समतोल साधला जातो. 

Ganapati Bappa Mahiti Marathi

ब्रम्हग्रंथी भौतिक शरीराशी निगडीत असते. विष्णूग्रंथी (अनाहत चक्रातील) अस्थिर शरीराशी निगडीत असते. रुद्रग्रंथी (अज्नचक्रातील) प्रासंगिक शरीराशी निगडीत असते. कुंडलिनी पुढे विशुद्धचक्रातून अज्नचक्रात जाते. या अज्नचक्रातून इडा आणि पिंगळा नाडी एकमेकाला छेदून डाव्या आणि उजव्या नाकपुडीतून बाहेर येतात. 


मूलाधारचक्रा ज्ञानइंद्रियासोबत जोडलेले असते. हत्तीचे मुख्य ज्ञानइंद्रिय सोंड(नाक) असते म्हणून देखील गणपतीला हत्तीच मुख दाखवलेले असते. मूलाधारचक्र हे लाल रंगाचे असते. गणपती मुलधाराचक्राचा स्वामी असल्यामुळे, ज्योतीषशास्त्रानुसार मंगळ(लाल ग्रह) ग्रहाचा अनिष्टपणा दूर करतो. वास्तुशांती करतांना नेहमी गणपती होम केला जातो. गणपती होम केल्यामुळे, व्यसनबाधा, भयबाधा ई दूर होतात.  

Ganapati Bappa Mahiti Marathi

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विनायक स्तोत्र

श्री ज्ञानदेवाची आरती

श्री लक्ष्मी नारायण हृदय स्त्रोत्र।