श्री विठोबाची आरती

                              श्री विठोबाची आरती


युगे अठ्ठावीस विटेवरी उभा | वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा |
पुंडलिकाचे भेटी परब्रम्ह आले गा | चरणी वाहे भीमा उद्धरी जगा || १ || 
जय देव जय देव जय पांडुरंगा || रखुमाईवल्लभा राहीच्या वल्लभा पावे जिवलगा
जय देव जय देव || धृ || 

तुळसीमाळा गळा कर ठेवुनी कटी | कांसे पितांबर कस्तुरी लल्लाटी | 
देव सुरवर नित्य येती भेटी | गरुड हनुमंत पुढे उभे राहती || जय || २ || 

धन्य वेणुनाद अनुक्षेत्रपाळा | सुवर्णाची कमळे वनमाळा गळा |
 राई रखुमाई राणीया सकळा | ओवाळिती राजा विठोबा सावळा || जय || ३ ||

ओवाळू आरत्या कुर्वंड्या येती | चंद्रभागेमाजी सोडुनिया देती | 
दिंड्या पताका वैष्णव नाचती | पंढरीचा महिमा वर्णावा किती || जय || ४ || 

आषाढी कार्तिकी भक्तजन येती | चंद्रभागेमध्ये स्नाने जें करिती | 
दर्शनहेळामात्रे तया होय मुक्ती | केशवासी नामदेव भावे ओवाळिती || 
जय देव जय देव जय || ५ || 

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विनायक स्तोत्र

श्री ज्ञानदेवाची आरती

श्री लक्ष्मी नारायण हृदय स्त्रोत्र।