मारुतीची आरती
मारुतीची आरती
सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी | करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनी ||कडाडिले ब्रम्हांड धाक त्रिभुवनी | सुरवर नर निशाचर त्यां झाल्या पळणी || १ ||जय देव जय देव जय श्रीहनुमंता | तुमचेनी प्रसादे न भी कृतांता || धृ ||दुमदुमले पाताळ उठिला प्रतिशब्द | थरथरला धरणीधर मानिला खेद |कडकडिले पर्वत उद्दगण उच्छेद | रामी रामदासा शक्तीचा शोध || जय || २ ||
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा