श्री मनाचे श्लोक
श्री मनाचे श्लोक
सदा सर्वदा योग तूझा घडावा
तुझे कारणी देह माझा पडावा
उपेक्षू नको गूणवंता अनंता
रघूनायका मागणे हेचि आतां ।।१
कैलास राणा शिव चंद्रमौळी
फणींद्र माथा मुकुटी झळाळी
कारुण्य सिंधू भवदु:खहारी
तुजवीण शंभो मज कोण तारी ।।२।।
मोरया मोरया मी बाळ तान्हें
तुझीच सेवा करु काय जाणे
अन्याय माझे कोट्यानुकोटी
मोरेश्वरा ब तू घाल पोटी ।।३।।
ज्या ज्या ठीकांणी मन जाय माझे
त्या त्या ठीकांणी निजरुप तुझे
मी ठेवितो मस्तक ज्या ठीकांणी
तेथे तुझे सदगुरु पाय दोन्ही ।।४।।
अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र
तिथे नांदतो ग्यानराजा सुपात्र
तया आठविता महापुण्यराशी
नमस्कार माझा सदगुरु ज्ञानेश्वराशी ।।५।।

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा