श्री देवीचा शारदीय नवरात्रौत्सव 2022

                    

    

             श्री देवीचा शारदीय नवरात्रौत्सव

                    श्री देवीचा शारदीय नवरात्रौत्सव----- माहिती पुढीलप्रमाणे---------

    नवरात्र 

उदयोस्तु जय जगदंबे !

यंदाच्या आश्विन शुद्ध प्रतिपदा( सोमवार दिनांक---२६/०९/२०२२  ) ते आश्विन शुद्ध दशमी(बुधवार दिनांक-- ०५/१०/२०२२  ) या कालावधीत श्री देवीचा शारदीय नवरात्रौत्सव सर्वत्र साजरा होणार आहे. या नवरात्रौत्सवा निमित्ताने आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा !


१) पहिला दिवस---आश्विन शुद्ध प्रतिपदा, सोमवार दिनांक---२६/०९/२०२२.

घटस्थापना. नवरात्रारंभ.

देवीचे शक्तीरुप--श्री महाकाली.

देवीचे नवदुर्गा रुप--श्री शैलपुत्री.

साडीचा रंग--पांढरा.

*नैवेद्य--गाईचे शुद्ध साजूक तूप.

 पहिल्या दिवशी श्री देवीला साजूक तूप अर्पण केल्याने आपणास बरे होण्याचे आशिर्वाद मिळतात.आणि शरीर निरोगी राहते.*

पांढरा रंग शुद्धता आणि शांततेच प्रतीक आहे.हा रंग धारण केल्याने आत्मविश्वास वाढतो.हा रंग आत्मशांती आणि सुरक्षिततेची भावना देतो.हा रंग शक्ती,शांती,ज्ञान, तपस्या आदिंचे प्रतीक आहे.

------_---------

श्री देवीचा शारदीय नवरात्रौत्सव-

२)दुसरा दिवस--आश्विन शुद्ध द्वितीया--मंगळवार दिनांक--२७/०९/२०२२.

श्री देवीचे शक्तीरुप--श्री महाकाली.

श्री देवीचे नवदुर्गा रूप--श्री ब्रम्हचारीणी.

साडीचा रंग---लाल.

 नैवेद्य--पंचामृत किंवा साखर.

दुसऱ्या दिवशी पंचामृत किंवा साखर देवीला अर्पण केल्याने आपल्या घरातील सर्व व्यक्तींचे वय वाढते.

लाल रंग शांती, पवित्रता,साहस, पराक्रम आणि प्रेमाचे प्रतीक आहे.हा रंग शक्ती आणि  चैतन्य देतो.

--------------------

श्री देवीचा शारदीय नवरात्रौत्सव-

३) तिसरा दिवस--आश्विन शुद्ध तृतीया,बुधवार दिनांक-२८/०९/२०२२.

श्री देवीचे शक्तीरुप--श्री महाकाली.

श्री देवीचे नवदुर्गा रूप--श्री चंद्रघंटा.

साडीचा रंग---गडद निळा.

नैवेद्य-- दूध किंवा खीर.

तिसऱ्या दिवशी देवीला दूध किंवा खीर अर्पण केल्याने दु:खापासून मुक्तता होते आणि परम आनंद प्राप्त होतो.


निळा रंग अतुलनीय आनंदाची अनुभूती देतो.हा रंग समृद्धी आणि शांता दर्शवतो.हा रंग साहस,बलिदान व असत्यावर सत्याच्या विजयाचे प्रतीक आहे.


--------------------

श्री देवीचा शारदीय नवरात्रौत्सव-

४) चौथा दिवस-- आश्विन शुद्ध चतुर्थी, गुरुवार दिनांक--२९/०९/२०२२..

श्री देवीचे शक्ती रुप--श्री महालक्ष्मी.

श्री देवीचे नवदुर्गा रूप--श्री कुष्मांडा.

साडीचा रंग--पिवळा.

नैवेद्य--मालपुआ.

  चौथ्या दिवशी देवीला मालपुआ अर्पण केल्याने बुद्धीमतेचा विकास होतो आणि निर्णय घेण्याची शक्तीही वाढते.*

पिवळा रंग सौभाग्याचा,संपतीचा आणि वैभवाचा प्रतीक आहे.ह्या रंगामुळे मन आशावादी आणि आनंदी रास्ते.हा रंग उबदारपणाचे प्रतीक आहे.हा रंग संतती,समृद्धी, स्नेह आणि मोक्षाचा आशिर्वाद देतो.

----_---------------

श्री देवीचा शारदीय नवरात्रौत्सव-

५) पाचवा दिवस.--आश्विन शुद्ध पंचमी, शुक्रवार दिनांक--३०/०९/२०२२. श्री ललिता पंचमी.


श्री देवीचे शक्ती रूप--श्री महालक्ष्मी.

श्री देवीचे नवदुर्गा रूप--श्री स्कंदमाता.

साडीचा रंग--हिरवा.

नैवेद्य--केळी.

पाचव्या दिवशी श्री देवीला केळी अर्पण केल्याने शरीर निरोगी राहते.

हां रंग निसर्गाचे प्रतीक आहे.हा रंग लाभ,प्रजनन,शांता आणि स्थिरतेची भावना निर्माण करतो.हा रंग जीवनातील नवीन सुरवात दर्शवतो.हा रंग आनंद आणि प्रकाशाचे प्रतीक आहे.

--------------------

श्री देवीचा शारदीय नवरात्रौत्सव-

६) सहावा दिवस-आश्विन शुद्ध षष्ठी, शनिवार दिनांक--१/०९/२०२२.

श्री देवीचे शक्तीरुप--श्री महालक्ष्मी.

श्री देवीचे नवदुर्गा रूप--श्री कात्यायनी.

साडीचा रंग--ग्रे-राखाडी.

नैवेद्य--मध.

सहाव्या दिवशी श्री देवीला मध अर्पण केल्याने आकर्षक शक्ती वाढते.

* राखाडी हां रंग शांत,मोहक आहे. या रंगाचा वापर चांगुलपणासाठी केला जातो.राखाडी रंग परिधान करून आपल्या जीवनातील सर्व नकारात्मक गोष्टी काढून टाकण्यासाठी श्री देवीला प्रार्थना करू शकता.हा रंग नवीन प्रारंभ आणि विकासाचे प्रतीक आहे.

----_---------------

श्री देवीचा शारदीय नवरात्रौत्सव-

७) सातवा दिवस-- आश्विन शुद्ध सप्तमी, रविवार दिनांक--०२/१०/२०२२--- श्री महालक्ष्मी पूजन (नागरी फुंकणे).

श्री देवीचे शक्तीरुप--श्री महासरस्वती.

श्री देवीचे नवदुर्गा रुप--श्री कालरात्री.

साडीचा रंग--केशरी.

नैवेद्य--गुळ.

सातव्या दिवशी श्री देवीला गुळ अर्पण केल्याने शोक दूर होतो आणि येणाऱ्या संकटांपासूनही संरक्षण होते.

केशरी रंग आकर्षक आणि सुंदर आहे.हा रंग सहसा उबदारपणा,आग आणि उर्जेशी संबंधित असतो.हा रंग बल आणि शक्तीचे प्रतीक आहे.

--------------------

श्री देवीचा शारदीय नवरात्रौत्सव-

८) आठवा दिवस--आश्विन शुद्ध नवमी, सोमवार दिनांक-- ०३/१०/२०२२-- दुर्गाष्टमी, महाष्टमी उपवास.

श्री देवीचे शक्तीरुप--श्री महासरस्वती.

श्री देवीचे नवदुर्गा रूप--श्री महागौरी.

साडीचा रंग-- मोरपंखी.

नैवेद्य-- नारळ.

आठव्या दिवशी श्री देवीला नारळ अर्पण केल्याने मुलांशी संबंधित अडचणी दूर होतील. आणि हा नारळ नवरात्र उत्थापन केल्यानंतर वाढवून त्याचा प्रसाद वाटप करावा.


मोरपंखी सुंदर रंग आहे.अलौकीक शक्ती देणारा आहे.हा रंग समृद्धी,नाविण्यता,उर्जा, महत्त्वकांक्षा आणि दृढ विश्वासाचे प्रतीक आहे.

--------------------

श्री देवीचा शारदीय नवरात्रौत्सव-

९) नववा दिवस--आश्विन शुद्ध नवमी, मंगळवार दिनांक--०४/१०/२०२२.

श्री देवीचे शक्तीरुप--श्री महासरस्वती.

श्री देवीचे नवदुर्गा रूप--सिध्दीदात्री.

साडीचा रंग--गुलाबी.

नैवेद्य-- पांढरे तीळ.

नवव्या दिवशी श्री देवीला पांढरे तीळ अर्पण केल्याने मृत्यूच्या भीतीपासून मुक्तता मिळेल आणि अनुचित घटनांपासूनही संरक्षण मिळेल.

गुलाबी रंग शांतता आणि बुद्धीचा रंग आहे.हा रंग प्रेम, स्नेह आणि सद्भावाचे प्रतीक आहे.

--------------------

आश्विन शुद्ध दशमी, बुधवार दिनांक--५/१० / २०२२.

रंग---भगवा किंवा जांभळा.

विजयादशमी(दसरा.) या दिवशी नैवेद्य--श्रीखंड, पुरणपोळी पंचपक्वानांसह भोजन.


श्री देवीचा नवार्णमंत्र-- *||ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चै नमः||

श्री देवीचा शारदीय नवरात्रौत्सव-

उदयोस्तु श्री जगदंबे.!!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विनायक स्तोत्र

श्री ज्ञानदेवाची आरती

श्री एकनाथाची आरती